Insert title here
  • फ्लॅट नंबर 7, त्रिमूर्ति क्लासिक, 'बी' विंग, सावतामाळी नगर, भुजबळ मळा, कोळकी रोड, फलटण, जि. सातारा.
  • (+91) 9923728009, (+91) 9552985123, (+91) 9579985123
  • info@agrifoundation.in
Slide background

एकच ध्यास शेतीचा विकास

काळी माती जीवन दाती
Slide background

शेतकऱ्यांचे जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न

एक ध्येय वेडा प्रवास

Slide background

शेतकरी नाही ,अन्न नाही , भविष्य नाही

शेतीची उन्नती देशाची प्रगती  • संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख हि एक कृषीप्रधान देश म्हणुन आहे.परंतु आजच्या काळात शेती करताना येणाऱ्या असंख्य अडचणींमुळे शेती क्षेत्रात काम करण्यास कोणीही उत्सुक दिसत नाही. आज शेतकरी म्हणून ज्या अडचणी आम्हाला जाणवतात, त्याच अडचणी कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतकरी मित्रांना जाणवत असतील. उदा. खते, बियाणे, अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती/ जैविक शेती इ. संबंधीच्या समस्या तसेच मजुरांचा अभाव किंवा मजुर वेळेवर न मिळणे.

    सर्व प्रथम शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा, आज शेतीक्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. यामुळे आपल्याला नफा-तोटा या बाबींचा विचार करून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल याचे नियोजन करता येईल. आम्हाला असे वाटते कि शेती करताना योग्य नियोजन, योग्य मजुर आणि सर्वात महत्त्वाचे योग्य वेळेवर काम केल्यास शेतीसारखे चांगले उत्पन्न मिळवून देणारा दुसरा व्यवसाय नाही.

    याच अनुभवाने आम्हाला एक नवीन कल्पना सुचली, असे एक माध्यम असावे कि ज्यामध्ये शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती खते बियाणे सर्वकाही, ट्रॅक्टर तसेच शेतीची अवजारे या संबंधीत काम करणाऱ्यांचा संपर्क, सेंद्रिय/जैविक शेतीसाठी लागणारी मदत मार्गदर्शन, शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय मार्गदर्शन, तसेच शेती क्षेत्रातील प्रत्येक कामासंबंधी लागणाऱ्या मजुरांचा संपर्क, उत्पादक ते थेट ग्राहक संपर्क. अश्या अनेक गोष्टींचे समाधान एका क्लिक वर या वेबसाईट कम अॅप्लीकेशन व्दारे करण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमाचे उदिद्ष्ट शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन व जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

Insert title here